Posts

Showing posts from October, 2020

पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापूर्वी स्त्रीला देण्याची माहिती

पोलीसात तक्रार दाखल करण्यामागे स्त्रीचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नवऱ्याला तात्पुरता धाक दाखवणे, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणणे, अद्दल घडवणे, मोडलेला संसार पुन्हा बसविणे, किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे इत्यादी. पोलिसांकडे तक्रार देण्यापूर्वी स्त्रीला पोलीस स्टेशनमध्ये *का तक्रार नोंदवायची आहे, हे समुपदेशकाने/सामाजिक कार्यकर्त्याने नीट समजून घेतले पाहिजे.* कधी कधी दोन्हीकडील नातेवाइकांमध्ये पूर्वीचे वैमनस्य असल्याने माहेरच्यांनी स्त्रीच्या मनाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे प्रकारही आढळून येतात. म्हणूनच पोलीस स्टेशनची मदत घेण्याच्या *चांगल्या-वाईट परिणामांची स्त्रीला माहिती देणे आवश्यक* असते. जेणेकरून त्या क्षणी पोलिसांची मदत घ्यायची अथवा नाही याबाबत ती स्वतः विचारपूर्वक निर्णय घेऊ शकेल. संबंधित पोलीस तिच्या तक्रारीवर कोणत्या प्रकारची कारवाई करतील, त्याबद्दल तिला प्राथमिक माहिती द्यावी. तिला छळणाच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत जास्तीत जास्त व कमीत कमी किती शिक्षा होण्याची शक्यता आहे, यावर चर्चा करावी. तक्रार किरकोळ स्वरूपाची आहे की, गंभीर हे स्पष्ट लिहिण्या...