Posts

पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापूर्वी स्त्रीला देण्याची माहिती

पोलीसात तक्रार दाखल करण्यामागे स्त्रीचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. नवऱ्याला तात्पुरता धाक दाखवणे, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणणे, अद्दल घडवणे, मोडलेला संसार पुन्हा बसविणे, किंवा त्याला शिक्षा झाली पाहिजे इत्यादी. पोलिसांकडे तक्रार देण्यापूर्वी स्त्रीला पोलीस स्टेशनमध्ये *का तक्रार नोंदवायची आहे, हे समुपदेशकाने/सामाजिक कार्यकर्त्याने नीट समजून घेतले पाहिजे.* कधी कधी दोन्हीकडील नातेवाइकांमध्ये पूर्वीचे वैमनस्य असल्याने माहेरच्यांनी स्त्रीच्या मनाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे प्रकारही आढळून येतात. म्हणूनच पोलीस स्टेशनची मदत घेण्याच्या *चांगल्या-वाईट परिणामांची स्त्रीला माहिती देणे आवश्यक* असते. जेणेकरून त्या क्षणी पोलिसांची मदत घ्यायची अथवा नाही याबाबत ती स्वतः विचारपूर्वक निर्णय घेऊ शकेल. संबंधित पोलीस तिच्या तक्रारीवर कोणत्या प्रकारची कारवाई करतील, त्याबद्दल तिला प्राथमिक माहिती द्यावी. तिला छळणाच्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत जास्तीत जास्त व कमीत कमी किती शिक्षा होण्याची शक्यता आहे, यावर चर्चा करावी. तक्रार किरकोळ स्वरूपाची आहे की, गंभीर हे स्पष्ट लिहिण्या

कायद्याची प्रश्नोत्तरे ३

 २७९,   ३३७,   ३३८ ही कलमे कशाची आहेत? भारतीय दंडविधान साहिता कलम 279- सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे. कलम 337- इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे.कलम 338 इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोहोचवणे. वरील तीनही कलमाअंतर्गत जामीन मिळू शकतो अटक होण्याची शक्यता नाही कोर्टात जाताना जामीनदार व त्यासोबत योग्य ती कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे.  वकिलांचा सल्ला घेणे इष्ट...
*कराराची वैधता, नोटरी आणि नोंदणी*  कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये करार ही अत्यंत किंबहुना सर्वात जास्त महत्त्वाची बाब आहे.  मालमत्तांच्या व्यवहाराला अशाच कराराने मूर्त स्वरूप देण्यात येत असते. यास्तव असे करार करताना आपला करार पूर्णपणे वैध आणि कायदेशीर आहे ना याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. करार या विषयावर आपल्याकडे *भारतीय करार कायदा* हा स्वतंत्र विशिष्ट कायदा आहे. त्या कायद्यातील तरतुदींनुसार कोणताही करार हा कायदेशीररीत्या वैध करार होण्याकरता पुढील बाबी आवश्यक आहेत.  *करार करणाऱ्या व्यक्ती असा करार करण्याकरता सक्षम म्हणजेच कायद्याने सज्ञान, मानसिक आणि बौद्धिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात* , असा करार हा त्यात सामील व्यक्तींनी मुक्त संमतीने केलेला असला पाहिजे. *मुक्त संमती* म्हणजे अशी संमती जी मिळवण्याकरता बळजबरी, फसवणूक, अयोग्य प्रभाव, फसवणूक इत्यादींचा वापर करण्यात आलेला नाही. करार या कायदेशीर गोष्टंकरताच झालेला आणि कायदेशीर मोबदल्याकरता झालेला असला पाहिजे, *बेकायदेशीर कृत्य करण्याकरताचा करार किंवा बेकायदेशीर मोबदला ठरलेला करार हा अवैध ठरतो.* (उदा. एखाद्याचा खून करण्यासाठी
*ज्येष्ठ नागरिकांसाठी – ज्येष्ठ व्यक्तींना (स्वतःवर) होणारी हिंसा ओळखण्यासाठी प्रश्नावली*  आजी-आजोबा, तुमच्या ओळखीच्या, नात्यातल्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केल जातं का? ही हिंसा आहे हे लक्षात घ्या. मदत मिळावा, सुरक्षित रहा. १) तुम्हाला घरातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही का? २) घरातील कोणतीच व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही का? किंवा कामापुरतेच बोलते का? ३) तुम्हाला न सांगताच घरातील सगळ्या व्यक्ती काही दिवसांसाठी बाहेर निघून जातात का? ४) तुम्हाला घरात नक्की काय चाललंय याबाबत माहिती दिली जात नाही का? ५) तुमच्याकडे असलेल्या पैशाची, दागिन्यांची सतत मागणी केली जाते का? किंवा तुम्हाला आत्ता त्याची काय गरज असं म्हणतात का? ६) तुम्हाला जमत नसलेली (म्हणजे तब्यतीमुळे किंवा इतर कारणांमुळे) कामे सांगितली जातात का? ७) तुमची तब्यत बरी नसली तरी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जात नाहीत का? वेळेत औषधं दिली जात नाहीत का? ८) तुम्हाला वेळेत जेवण दिले जात नाही का? जेवण देतंच नाहीत का? ९) तुमचा सतत अपमान केला जातो का ? टोमणे मारले जातात का? १०) तुमच्या सहवासात घरातील कोणीही व्यक्ती थांबत

आईच्या जातीच्या दाखल्या वरून मुलीस दाखला-* *न्यायालयाचा क्रांत्तीकारी निर्णय**

**आईच्या जातीच्या  दाखल्या वरून  मुलीस दाखला-* *न्यायालयाचा क्रांत्तीकारी निर्णय** अनिल वैद्य माजी न्यायाधीश✍  मुबई उच्य न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आईच्या जातीवरून मुलीस जात प्रमाण पत्र देण्यासाठी सरकारला आदेश दिले .या निर्णयाचे परिवर्तनवादी व महिला संघटनानी जोरात स्वागत करायला पाहिजे होते परन्तु या संघटनानाही या निर्णयाचे महत्व कळले असे दिसत नाही.  हे प्रकरण असे की,अमरावती महसूल विभागात राहणाऱ्या नुपूर या हलबा जातीच्या मुलीस जातीच्या प्रमाण पत्रा साठी अर्ज करतांना वडिलांच्या जातीचे पुरावे अर्थात वडिलाचे जातीचे प्रमाण पत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याची गरज होती परन्तु तिच्या आई वडिलांचे आपसात वाद असल्याने ते विभक्त राहतात. नुपूर आपल्या आईसोबतराहते. मुलीस दाखला मिळू नये अशा क्रूर भावनेने विभक्त राहणाऱ्या वडिलांनी आपला जातीचा दाखला व कोणताही जातीचा पुरावा असलेले दस्तऐवज देण्यासाठी नकार दिला.त्यामुळे नूपुर समोर दाखला मिळविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत तिने आईच्या जातीचे प्रमाण पत्र व इतर दस्तऐवज दाखल करून जातीच्या दाखल्या साठी  अमरावती उपविभागीय अधिकाऱ्यां कडे

पोलीस कारवाईसंबंधीची माहिती

एक नागरिक म्हणून आपल्याला हे माहित हवं पोलीस कारवाईसंदर्भात वेगवेगळे शब्द किंवा संकल्पना वापरल्या जातात. उदा. घराची झडती घेण्यात आली, किंवा चौकशीसाठी चौकीत बोलावले आहे. इत्यादी. अशा वेळेस पोलीस नक्की काय करतात आणि नागरिक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी, यासबंधी माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण पोलीस कारवाई संदर्भातील आपले अधिकार वापरू शकू. त्यासाठी आपण खालील काही माहिती घेणे आवश्यक आहे.  *गुन्ह्याचे प्रकार*  गुन्ह्याचे दोन प्रकार आहेत. दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा. या दोन्हीत फरक आहेत.  *दखलपात्र गुन्हा*  या गुन्ह्याची दखल पोलीसांना घ्यावीच लागते. याबाबत ताबडतोब तपास सुरू करावा लागतो. या गुन्ह्यात वॉरंटशिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकतात. गुन्ह्याची नोंद एफ.आय.आर. रजिस्टरमध्ये लिहिली जाते. उदा. चोरी, खून, बलात्कार इत्यादी.  *अदखलपात्र गुन्हा*  एन.सी ओफेन्स (नॉन कोग्निसिबल) हा शब्द अदखलपात्र गुन्ह्यासाठी वापरला जातो. या गुन्ह्यात न्यायाधिशाच्या हुकुमाशिवाय अटक करण्याची परवानगी पोलिसांना नसते. या गुन्ह्यासाठी वेगळे रजिस्टर ठेवले जाते. उदा. शिवीगाळ करणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे,

हाही छळच आहे

*_फोन, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया आदि माध्यमांचा उपयोग करून मुलींना त्रास देणे, लैंगिक छळ करण्याचे अनेक प्रकार आपण नेहमी ऐकतो, पाहतो, अनुभवतो. खाली अशा काही प्रकारांची एक यादी देत आहोत. तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केलं जातं का? तर ही हिंसा आहे हे लक्षात ठेवा.*  1) तुम्हाला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविले जातात का? २)तुम्हाला वॉट्स अॅपवरून अश्लील मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवले जातात का? ३)वॉट्स अँपसारख्या माध्यमातून तुमची इच्छा नसताना विनाकारण तुमच्याबरोबर चॅट करण्याचा प्रयत्न केला जातो का?_  4) फेसबुकवर असेलेल्या तुमच्या फोटोंचा गैरवापर केला गेला आहे का? ५) फेसबुकवर तुमची इच्छा नसतानाही कोणी चॅट करून त्रास देतात का? ६) तुमचे प्रोफाईल वापरून किंवा तुमची माहिती वापरून कोणी खोटे अकाउंट तयार केले आहे का? 7) फेसबुकवर मैत्री करून कोणत्याही कारणासाठी फसवलं आहे का? 9) फेसबुकवरील तुमच्या फोटोचा गैरवापर करून ब्लॅकमेल करत आहेत का? 10) फेसबुकवर मैत्री करून नंतर प्रेमाचं खोटं नाटक करून तुम्हाला एकांतात बोलवून लैंगिक शोषण केले आहे का/ करत आहेत का? 11) तुम्हाला मेलवरून अश्लील मेसेज, फो