कायद्याची प्रश्नोत्तरे २

प्रश्न- सरजी, मी धुळे जिल्हाचा आहे. माझी शेती 1:33 एकर आहे. शेजारी भाऊ आहे. माझी शेती तो देत नाही. यावर पर्याय काय? व भुमी अभिलेख पण मोजणी करण्यास येत नाही. कारण ज्याने दबाव बसवला आहे. तो राजकारणी आहे.
उत्तर- मालमत्ता वंश परंपरेने मूळ जमीन धारकापर्यंत (वडील) आली असेल तर, अश्या मालमत्ते मध्ये मुलगा/मुलगी यांच्या जन्मापासून समान हक्क सध्याच्या प्रचलित कायद्याने आहे. अश्या मालमत्तेचे वाटप मुलगा/मुलगी यांचे नावे करायचे असल्यास 500 स्टॅम्प वरती करून, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करता येते. परंतु अशी मालमत्ता हस्तांतरण करताना सर्व वारसांची परवानगी असणे फार महत्वाचे आहे. याचे कारण त्यांचाही वाडवडीलर्जीत मिळकतीमध्ये समान हक्क असतो.

या उलट, मालमत्ता स्व कष्टाने मिळविलेली, स्व कमाईवर विकत घेतली असेल तर, अश्या व्यक्तीला ती मिळकत कोणालाही हस्तांतरित करण्याचा, गिफ्ट देण्याचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे इच्छापत्राद्वारे/मृत्युपत्राद्वारे मृत्यूपूर्व नोंद करून ठेवता येऊ शकते. या सर्व बाबींचा नोंदी /रजिस्टर, दुय्यम निबंधक कार्यालय याठिकाणी करता येतात. 

या बाबी करताना योग्य वकील नेमून काम करावे... कोणत्याही agent मार्फत या गोष्टी करू नये... सध्या फक्त copy -pest चा जमाना आहे. फक्त रिकाम्या जागा भरल्या जातात. त्यामुळे वकिलाची नेमणूक महत्वाची...

Comments

Popular posts from this blog

दत्तक कायदा