दत्तक कायदा
मूल दत्तक घेण्यासंबंधी ‘वैयक्तिक कायद्याप्रमाणे’ या कायद्यातही फरक आढळतो. कोणतेही मूल दत्तक घेताना कायदेशीर गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे आहे. कारण कायद्याने मूल दत्तक घेल्यानंतरच ते कायदेशीर वैध ठरते. मुस्लिम व खिस्ती लोक मूल दत्तक घेऊ शकत नाहीत. ते फक्त मुलाचे पालक (जबाबदारी किंवा गार्डियनशिप) घेऊ शकतात. गार्डियनशिपसाठीचा वेगळा कायदा आहे. *महत्वाच्या तरतुदी* दत्तक घेण्याचे मूल व दत्तक घेणारे आई-बाबा दोघेही हिंदू असले पाहीजेत. दत्तक मूल हे १५ वर्षांखालील आणि अविवाहित असणे गरजेचे आहे. विधवा, घटस्फोटित किंवा अविवाहित महिलेला मूल दत्तक घेता येते. महिला विवाहित असेल तर तिचा नवरा मूल दत्तक घेऊ शकतो. तिला दत्तक घेता येत नाही. मात्र पती मानसिक आजारी असेल, संन्यास घेतला असेल अगर हिंदू नसेल तर तिला मूल दत्तक घेता येते. पुरूष मूल दत्तक घेवू शकतो. यासाठी तो २१ वर्षे पूर्ण, मानसिकदृष्ट्या सुदृढ म्हणजे मानसिक आजार नसावा, अविवाहित, विवाहित असेल तर पत्नीची संमती आवश्यक राहील. पतीने मूल दत्तक घेतल्यानंतर पत्नीला आपोआपच त्या दत्तक मुलाची आई म्हणून कायदा मान्यता देतो. स्त्री आणि पुरुष दोघेही...